३५ वर्षांपासून कन्हाळगावच्या श्री गुरुदेव महिला भजनी मंडळाकडून समाजप्रबोधन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील श्री गुरुदेव महिला भजनी मंडळ गेल्या ३५ वर्षांपासून भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे करीत आहे. हुंडाबळी प्रतिबंध, वृक्षारोपण, स्त्री सन्मान, सामाजिक ऐक्य आणि विविध जनजागृतीपर विषयांवर भजनांच्या माध्यमातून मंडळ समाजात सकारात्मक संदेश देत आहे.

या भजनी मंडळाच्या कार्यात ढोलक मास्टर म्हणून युवा गुरुदेव मंडळाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम लाला ठेंगडी हे अनेक वर्षांपासून सक्रिय योगदान देत आहेत. तसेच हार्मोनियम वादक राकेश वाघधरे यांचेही मंडळाला मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२६ रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोटा) येथे आयोजित दिंडी, पालखी सोहळा व जिल्हास्तरीय कलाकार मेळाव्यात कन्हाळगावच्या श्री गुरुदेव महिला भजनी मंडळाने सहभाग घेतला. यावेळी मंडळाने भजनांच्या माध्यमातून समाजकार्य, प्रबोधन व मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.कन्हाळगावचे हे भजनी मंडळ केवळ आपल्या गावापुरते मर्यादित न राहता विविध गावांमध्ये जाऊन सामाजिक संदेश देण्याचे कार्य करत असून परजिल्ह्यातही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मंडळाच्या या उल्लेखनीय कायार्चे सर्वत्र कौतुक होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *