
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहराच्या राजका- रणात ‘विकासपुरूष’ म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार राजू कारेमोरे आणि कामाचा प्रचंड उरक असलेले नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे या जोडगोळीने बुधवारी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. डोंगरला घाट येथील मोक्षधाम परिसरासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विशेष निधीतून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या विकासकामांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मोक्षधाम परिसराचा प्रश्न आता कायमचा सुटणार असून, शहराच्या वैभवात मोलाची भर पडणार आहे. मोक्षधाम परिसरातील असुविधांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, आमदार राजू कारेमोरे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे या कामासाठी विशेष पाठपुरावा केला होता. खासदारांनीही या मागणीची दखल घेत भरघोस निधी उपलब्ध करून दिला.
या कामाचे भूमिपूजन आ. कारेमोरे यांच्या शुभहस्ते पार पडले. विशेष म्हणजे, नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे यांनी या प्रकल्पाचा आराखडा अत्यंतआधुनिक पद्धतीने तयार करून तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळवून घेतली. यामुळे या ‘युती’चा करिश्मा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, ‘विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असाच संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून डोंगरला घाटावरील मोक्षधामाच्या विकासाची मागणी नागरिक करत होते. नवीन आराखड्यानुसार या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आधुनिक आणि सुसज्ज शेड. पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची उत्तम सोय. परिसराचे सौंदर्यीकरण आणि वृक्षारोपण.पावसाळ्यात होणारी चिखल व पाण्याची कोंडी फोडण्यासाठी काँक्रिटीकरण.
या ऐतिहासिक प्रसंगी नगरसेवक यासिन छवारे, पंकज बालपांडे, गुलराज कुंदवाणी, सोनिया धुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंगणे मोक्षधाम समितीचे कार्यकारी अध्यक्ष बाल्या मदनकर आणि सचिव पत्रकार अनिल कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी लालु ईसारीया, भारत भेदे, विष्णू जोशी, पंढरीनाथ धुर्वे, सुशील आगाशे, प्रदीप भरणेकर, मोंटू चोपकर, बापू बडवाईक, राहुल रणदिवे यांसह जयश्री गभने, पमा ठाकुर, नेहा मोटघरे, नंदा डोरले, मीना गाढ़वे, पाठक ताई या महिला पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकासकामांचे स्वागत केले.