
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०५ व्या यंतीनिमित्त भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक येथे दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा व गणेशपुर येथिल युवा सेवकांनी कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता व बाबा व मानवधर्म एकच आहे या गोष्टीचा विचार करून सर्व गटातील युवा सेवकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सर्व प्रथम बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे सकाळी ९.०० वाजता पूजन करण्यात आले, नंतर प्रतिमेला माल्यार्पण करून सकाळची विनंती करण्यात आली व लगेच महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. सेवक सेविका व बालगोपालांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने गोवर्धन साकुरे, सौ.वर्षा साकुरे, यशवंत सोनकुसरे, गोवर्धन निनावे, राकेश मडामे, राकेश कुंभलकर, हिमांशु चोपकर, आकाश निर्वाण, बंटी गायधने, स्वप्निल खंगार हे पुजनाच्या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गोवर्धन निनावे, शुभम गायधने, राकेश मडामे, राकेश कुंभलकर, महेश गायधने, स्वप्निल खंगार, हिमांशु चोपकर, आकाश निर्वाण, बंटी गायधने, सचिन जुनघरे, आकाश कुंभलकर, गोपाल डोकरीमारे, बाला निखाडे, राजेश बोरसरे, मंगेश साठवणे, गोलू भादाडे, प्रज्वल चकोले, प्रशांत गायधने, बल्लू भाऊ, अतुल तितिरमारे, किशोर डोरले, सौरभ भुरे, प्रवीण मडामे, भुपेश मडामे, हर्षल शिंदे, विकी मडामे निहाल बावणे, अरुण मोहनकार, मनोज वंजारी, विनोद डोरले, श्रीकांत पवनकर, गिरधर मानकर, रजत मेश्राम, कालू चप्पल, प्रकाश मडामे, आकाश ऊके, शुभम केवट, शुभम आगरे, प्रदीप तरोने, सतीश मडामे, पंकज देशमुख, प्रदीप मंदुरकर, अर्जुन नंदुरवार, आदित्य बळवाईक, अभिजीत बावनऊके, अमित करंडे, पियुष बाबरे, सागर देशमुख व समस्त परमात्मा एक भंडारा गणेशपुर चे युवा सेवक उपस्थित होते.