
भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या घोडेझरी येथील प्लांटमधून निघणारे काँक्रीट म्हणजे नेमके काय, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे. ज्या रस्त्यांनी तालुक्याच्या विकासाची भाग्यरेषा ठरायला हवे होते, तेच रस्ते आता कंत्राटदार आणि अधिकाºयांच्या ‘अर्थपूर्ण’ अभिसरणाचे केंद्र बनले आहेत. नियमानुसार, रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘क्वालिटी कंट्रोल’ च्या टीमने पाहणी करणे अनिवार्य असते. सिमेंट, वाळू आणि राखेचे (ऋ’८ अ२ँ) (दउ) मिश्रण होताना तिथे सरकारी प्रयोगशाळेचा अहवाल असणे गरजेचे आहे.
मात्र, लाखांदूरमधील या कामांवर देखरेख ठेवणारे कनिष्ठ अभियंता आणि उपविभागीय अभियंता नेमके कुठे गायब आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँक्रीटमध्ये राखेचा अतिवापर केल्यामुळे रस्ते बांधून महिनाही उलटत नाही, तोच त्यावर बारीक तडे दिसू लागले आहेत. सिमेंटच्या रस्त्याला किमान २१ दिवस पाण्याची ‘तराई’ आवश्यक असते. मात्र, कंत्राटदाराने केवळ औपचारिकता म्हणून पाण्याचे शिंपण करून काम गुंडाळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या शोल्डरला (कडेला) मजबुती देण्यासाठी मुरूम वापरण्याऐवजी शेतातील काळी माती वापरली जात आहे. पहिल्याच पावसाळ्यात हा रस्ता खचून वाहने उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. (उ४१्रल्लॅ) प्रशासनाचा ‘कारभार’ आणि जनतेचा ‘दरारा’ यात आता कोणाची सरशी होते, हे येणारा काळच ठरवेल!