एकाच रात्री चार दुकाने फोडली

भंडारा पत्रिका/वार्ताहर पालांदूर : शनिवारी (दि. ३ जानेवारी) मध्यरात्री ते रविवारच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खराशी येथील दोन कृषी केंद्र व दोन ज्वेलरी दुकानांचे शटर वाकवून व शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली. यात चोरट्यांनी रोख रकमेसह एकूण अंदाजे ७४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी पालांदूर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील खराशी येथे बसस्थानक परिसरात शेळके बंधू व दिघोरी(मोठी) येथील मुकेश देशमुख यांचे कृषी सेवा केंद्र तसेच पालांदूर येथील रोकडे बंधूंचे ज्वेलरीची दोन दुकाने आहेत. शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. या दुकानाच्या गल्ल्यात असलेली २ हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरली.

चोरट्यांनी आपला मोर्चा वळवत जवळच असलेल्या शेळके बंधू यांच्या सुभेदार कृषी केंद्र या दुकानाचा शटर वाकवून तेथील १२ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तेथीलच असलेल्या रोकडे बंधू यांच्याच मालकीच्या दोन्ही ज्वेलरी दुकानाकडे वळवला. तेथेही चोरट्यांनी ६० हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या ज्वेलरीवर हात मारला. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी एकूण ७४ हजार रुपयांच्या मुद्देमाल लंपास करुन चोरटे पसार झाले. या चोरीच्या घटनेची वार्ता परिसरात रविवारी अगदी सकाळी वाºयासारखी पसरली.

जवळच वास्तव्यास असणाºया कुणाल झलके यांनी भ्रमणध्वनीवरून फिर्यादी राजू रोकडे यांना माहिती दिली. नंतर संबंधीतांनी पालांदूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पालांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश बनसोड, पोलीस कर्मचारी कमलेश दिघोरे, शिंगणजुडे आदी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. याबाबत पालांदूर पोलिसांनी राजू रोकडे यांच्या फिर्यादीवरून अप.क्र. ३/२०२६ कलम ३३१(४), ३०५ अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पालांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश बनसोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेन्दोर करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *