अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट ठार

भंडारा पत्रिका/ वार्ताहर खापा/तुमसर : तुमसर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खरबी शिवारात ४ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान अज्ञात वाहनाने काळवीटाला धडक दिल्याने काळविटाचा तुमसर येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील तुमसर-भंडारा राष्ट्रीय मार्गावर खरबी शिवारात अन्नपाण्याच्या शोधात हरीण आणि काळवीट यांच्यासह अन्य वन्यप्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत.

या राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेकदा प्राण्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत. त्यात काही दिवसापूर्वी एक हरीण ठार झाल्याची घटना घडली होती. वनविभागाच्या कडक कायद्याच्या धाकात सुध्दा वाहनचालक मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अजिबात करीत नसल्याचे उदाहरण समोर येत आहेत. त्यात उपचाराअभावी अनेक वन्यप्राण्यांच्या जीव गेल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यास मिळाली आहे. दरम्यान आज ४ जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान चारा पाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडत गावाकडे मार्ग क्रमण करणाºया एका काळवीटला अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडताना जबर धडक दिली. त्यात काळवीट गंभीर जखमी झाला.

दरम्यान उपचारासाठी तुमसर पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यात उपचारादरम्यान काळविटाचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती तुमसर वनपरिक्षेत्र क्षेत्र कार्यालयाला देण्यात आली. दरम्यान वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचली भटक्या व हिंस्र, श्वानापासुन, अथवा वाहनापासुन मृत काळवीटाला धोका पुन्हा पोहचु नये म्हणून येणाºया जाणाºया वन्यप्रेमींनी, वनविभाग व पोलीस विभागाच्या कर्मचाºयांनी काळविटाला राष्ट्रीय महामार्गावरुन बाजूला करुन तुमसर पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. दरम्यान वन्यप्रेमी तळ ठोकुन होते. मृत काळविटावर वन अधिकाºयांच्या उपस्थितीत जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *