
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : संपूर्ण देशामध्ये ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. राजमुद्रा ग्रुप तर्फे दरवर्षी तुमसर शहरामध्ये महिला दिनानिमित्त महिलांचे विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यावर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाºया तुमसर नगर परिषदेचे नगरसेविकांचे सत्कार करण्यात आला. त्यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना मान देण्यात आला. महिला दिनानिमित्त राजमुद्रा ग्रुप तर्फ आयोजित मॅरेथॉन बांगळकर शाळेसमोर आयोजित करण्यात आली होती, ज्यात शहरातीलच नव्हे तर जिल्हयातील व ग्रामीण भागातील महिला सहभागी झाल्या होत्या प्रथम पारितोषिक ३३३३, द्वितीय पारितोषिक २२२२, तृतीय पारितोषिक ११११ ठेवण्यात आले होते.
ज्या मध्ये शहरातील ४५ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात धनवंत आगाशे यांनी प्रथम पारितोषिक पटकावले, अर्चना पंधरे यांनी द्वितीय, सपना पटले यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. पारितोषिक पटकावले त्यांना राजमुद्रा ग्रुप तर्फे रोक रकमेचे पुरस्कार देण्यात आले. मॅरेथॉनचे विशेष भाग म्हणजे यामध्ये ८० वर्षाच्या आजीने भाग घेत दौड लगावली. सदर कार्यक्रमात पोलीस प्रशासन तुमसर, शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजमुद्रा ग्रुप महिला मंडळाने अथक प्रयत्न केले. संताजी सभागृहात आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध सेवाभावी महिला संघटना प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यात तुमसर येथील लोकमत सखी मंच, ग्लोरी झुंबा फिटनेस क्लब, वी क्लब, इंडियन रेडक्रॉस फेडरेशन भंडारा, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन, सर्व महिला बचत गट, ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय, जेसीआय तुमसर, उडान, जिजामाता महिला मंडळ यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता कोंडेवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजिताताई कारेमोरे, प्रमुख अतिथी म्हणून शक्ती दीदी, वर्षा मालेवार, गोल्लर ताई ह्या होत्या. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता राजमुद्रा ग्रुप महिला मंडळाच्या मीरा भट, मीनल लीमजे, नेहा मोटघरे, पल्लवी निनावे, आरती मोहतुरे यांनी पुढाकार घेतले व संपूर्ण राजमुद्रा ग्रुप महिला मंडळ व राजमुद्रा ग्रुपचे मावळ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला राजमुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सागर गभने, शुभम बाणासुरे, सागर भुरे, योगेश आजापुजे, राहुल रणदिवे, बापू बड-वाईक, स्वप्निल डुंबरे, आयुष कुंजेकर, संकेत गजबीये, मनीष गायधणे, प्रतीक निखाडे सर्व पदाधिकारी, सदस्य गण उपस्थित होते.