लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचाºयांचा ‘सुळसुळाट’ अधिकारी-कर्मचारी बेपत्ता, आदिवासी जनतेची पायपीट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाºया लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यालयातील अनेक कर्मचारी आणि खुद्द अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने किंवा कर्तव्यावर हजर राहत नसल्याने कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. यामुळे कामानिमित्त येणाºया गरीब आदिवासी जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. लेंडेझरी हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला असून, वन्यजीव आणि मानवी संघर्ष येथे नित्याचाच आहे. अशा संवेदनशील भागात वनविभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयातील कर्मचारी आपल्या वेळेनुसार येतात आणि गायब होतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

रिकाम्या खुर्च्या: कार्यालयात फेरफटका मारला असता अनेक महत्त्वाच्या विभागांतील खुर्च्या रिकाम्या दिसून येतात.

अधिकारी संपकार्बाहेर: वरिष्ठ अधिकारी देखील अनेकदा फील्ड व्हिजिटच्या नावाखाली कार्यालयातून गायब असतात, ज्यामुळे सर्वसामान्यांची कामे रखडलेली आहेत.

आदिवासींची परवड: दूरवरच्या पाड्यातून आणि गावांतून आलेल्या आदिवासींना आपले अर्ज देण्यासाठी किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी तासनतास ताटकळत राहावे लागते. अनेकदा रिकाम्या हाताने परत जावे लागल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे.

जंगल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचापरिणाम केवळ प्रशासकीय कामावरच नाही, तर जंगल सुरक्षेवरही होत आहे. कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने अवैध वृक्षतोड, जंगलात होणाºया अवैध वृक्षतोडीवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. शिकारींचे धाडस, कर्मचाºयांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत शिकारी सक्रिय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनवा नियंत्रण, उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलाला आग लागण्याच्या घटना घडतात, अशा वेळी हजर कर्मचारी नसल्यास मोठी हानी होऊ शकते.

याप्रकरणी वरिष्ठ दखल घेणार का?

शासनाकडून दुर्गम भागात काम करणाºया कर्मचाºयांना विविध भत्ते दिले जातात, मात्र तरीही मुख्यालयी न राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील या ‘दांडीबहाद्दर’ कर्मचाºयांवर वरिष्ठ वनाधिकारी कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बायोमेट्रिक हजेरी किंवा अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *