लाखांदूर तालुक्यात विशेष घटक योजनेत मोठा भ्रष्टाचार जनावरे खरेदीत लाभार्थ्यांची फसवणूक

भंडारा पत्रिका/वार्ताहर बारव्हा : शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाºया दुधाळ जनावरे वाटप योजनेत लाखांदूर तालुक्यात मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पशु वैधकीय अधिकारी आणि पुरवठादारानी संगणमत करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी केला असून याप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे सचिव, व आयुक्त यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजने अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना ७०% अनुदान व इतर प्रवगार्तील लाभार्थ्यांना ५०% अनुदानवर दुधाळ गाई व म्हशीचे वाटप करण्यात आले.

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पशुपालकांना आर्थिकदुष्टया सक्षम करणे हा होता. मात्र प्रत्यक्षात ही योजना अधिकारी आणि पुर- वठादारांच्या फायद्याची ठरल्याचे दिसत आहे. निवेदनातील आरोपनुसार बाजारात ज्या म्हशीची किंमत साधारणता १ लाख ६० हजार रुपये आहे. त्या म्हशी केवळ ७० ते ७५ हजारात खरेदी करून लाभार्थ्यांना देण्यात आल्या. गाईच्या खरेदीत असाच प्रकार घडला असून त्याची खरेदी अर्धा किमतीत करण्यात आली. कमी किमतीत जनावरे खरेदी करून पुरवठादाराच्या नावाने मात्र पूर्ण किंमतीचे (शासकीय दराप्रमाणे) देयके काढून शासनाची दिशाभूल करण्यात आली. कमी किंमतीत खरेदी केल्यामुळे जनावराचा दर्जा निकृष्ट असून लाभार्थ्यांना अपेक्षित दूध उत्पादन मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

हा सर्व व्यवहार पशुवैधकीय अधिकारी आणिपुरवठादारानी स्वमर्जीने आणि सगणमताने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत चंद्रशेखर टेम्भूरणे यांनी महाराष्ट्र राज्याचे सचिव, पशुसंवर्धन आयुक्त पुणे, आणि जिल्हाधिकारी भंडारा यांना यांना निवेदन पाठविले असून या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व पुरवठादारावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे पशुसंवर्धन विभागात खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासन यावर काय पाऊले उचलते याकडे सर्व तालुकावाशियांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *