धान खरेदी सुरू करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : आज राज्यातील युवा,विध्यार्थी,शेतकरी,बेरोजगार,म् ाहिला सुरक्षा,कामगार अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचनींना समोर जावे लागत आहे कापूस, सोयाबीन,भात,तूर या शेतमालाला भाव नाही अतिवृष्टी किव्हा दुष्काळीमुळे पिकाचे नुकसान होऊनही विम्याची पैसे मिळत नाही राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला भंडारा जिल्हा हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मार्केटिंग फेडरेशन मार्फत विविध धान खरेदी केंद्रावर २२ नोव्हेंबर पासून धान खरेदी करण्यात आलेली होती. मात्र अचानक कारणे सांगून धान खरेदी बंद करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकºयांना मागील हंगामातील अद्यापही पैसे वेळेत मिळाले नाही. त्यातच नवीन हंगामासाठी लागणारा खर्च बियाणे,मजुरी, खते, औषध, घरखर्च तसेच बँक कजार्ची परतफेड यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक ताण पडला आहे. विधानसभा निवडणुकी पूर्वी शेतकºयांना बोनस देऊ असे आश्वासने देण्यात आली मात्र अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे शेतकºयामध्ये तीव्र नाराजी आहे.तरी शासनाने बंद पडलेली धान खरेदी सुरु करावी. प्रलंबित देयके त्वरित अदा करावी तसेच बोनस जाहीर करावं असे निवेदनमार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवनी तालुका अध्यक्ष घनश्यामजी वंजारी, राकेश हटवार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस भंडारा नितीन तळमले, योगेश कोरे, संकुल शहारे,प्रेमदास मोहरकर,हरीश ठवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *