बावनथडी नदीकाठालगतच्या १५ गावात पाण्याची भीषण टंचाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : उन्हाची दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला आहे. तालुक्यातील विहरी, तलाव पूर्णत: आटले व बोरवेल सुद्धा बंद पडल्याने विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर तर आला आहेच त्याच बरोबर शेतकºयांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकºयांनी व नागरिकांनी केली आहे तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकºयांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला. त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणात आहे.

त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. निर्सगावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्री चा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात मात्र, गत पावसाळ्यात पडलेला अत्यंत अल्प पाऊस व उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी तलाव तळ गाठत आहे. त्यावर शेती फिडर च्या भारनियमन मुळे शेतकºयांच्या उभ्या पिकांना फटका बसला आहे.

आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकºयांनी परत कर्जबाजारी होऊन नव्या उमेद ने उन्हाळी हंगामात ऊस व धानपिक शेतात लावले परंतु, विहारी, तलाव, बोअरवेल आटल्याने त्या उभ्या पिकांना कसे वाचविता येईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बावनथडी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा आहे. त्या पाण्याचा नदीपात्रात निचरा झाल्यास जलस्तर वाढून विहिरींना पाणी येईल व पिकांना जीवनदान मिळेल. मात्र, शेतकºयांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातुन पाणी शेतकºयांना मिळत नसेल व पाण्या अभावी शेतकºयांचे उभे पीक मरत असतील तर त्या प्रकल्पाचा फायदा तरी काय?असा संतप्त सवाल शेतकºयांनी केला आहे. लोक प्रतिनिधी ने याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *