शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आठव्या बलिदान दिनी पवनीत देशभक्तीची धाव; व्यापारी संघाची भव्य मॅरेथॉन उत्साहात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पवनी तालुक्याचे भूमिपुत्र वीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर हे पाकिस्तानी भ्याड हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या आठव्या गौरवशाली बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तसेच युवक व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने व्यापारी संघ, पवनी यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

शहरात सकाळीच देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. शालेय विद्यार्थी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुले व मुलींसाठी स्वतंत्र अशा चार गटांमध्ये स्पर्धा पार पडली. १४ वर्षांखालील मुले गटात ऋषिकेश प्रवीण देशमुख यांनी प्रथम, वीर अजय भोस्कर यांनी द्वितीय तर कृष्णा सुरेश भानारकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांवरील मुले गटात प्रणय ज्ञानेश्वर माहूरले प्रथम, रोहित विजय पटले द्वितीय तर अजित अशोक उके तृतीय आले. १४ वर्षांखालील मुली गटात रोशनी डोमेश निखार प्रथम, उर्वशी अजय निंबार्ते द्वितीय तर माही रामा पडोळे तृतीय ठरल्या. १४ वर्षांवरील मुली गटात अंजली अरविंद मळावी प्रथम, प्राची सुदान बोंद्रे द्वितीय तर श्रावणी विलास मोहरकर तृतीय क्रमांकावर राहिल्या. प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम ३००१ रु., द्वितीय २००१ रु. व तृतीय १००१ रु. रोख पारितोषिकांसह शिल्ड प्रदान करण्यात आले.

बक्षीस वितरण वीरमाता सुधाताई अंबादासजी मोहरकर यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमास व्यापारी संघ पवनीचे अध्यक्ष देवराज बावनकर, मार्गदर्शक लिलाधर मुंडले, मनोहर ढोमणे, उपाध्यक्ष दत्तूभाऊ मुनरतिवार, सचिव महादेव शिवरकर, सहसचिव पंकज सावरबांधे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, डॉ आंबेडकर हायस्कूल पावनी चे विवेक गायधने, नगर परिषद विद्यालय पवनी चे मुख्याध्यापक रवी बीलवने, तसेच व्यापारी संघ संचालक विजय पाटील, विजय ब्राह्मणकर, विनय राऊत, श्यामजी राठी, राजू तुळसकर, प्रवीण इनकने, प्रशांत भोसले, मनोज माळवी, लिलाधर काटेखाये, विकास सूरकर, किशोर भांडारकर, धनराज रासेकर, विवेक चामोर्शीकर, गिरीधर उरकुडकर, पोलिस स्टेशन पवनी येथील येवले साहेब आणि इतर पोलिस अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पवनीचे अधीक्षक डॉ लांबट साहेब आणि त्याची चमू तसेच संत जगनाडे महाराज आय. टी. आय. पवनीचे प्राचार्य योगेश बावनकर, विवेक रायपूरकर, मिलिंद बोरकर, रवी लांजेवार, प्रणय थोटे आदी सहकार्य केले. बहुसंख्य प्रतिष्ठित शाळांचे क्रीडाशिक्षक जगदीश देशमुख, राजेश येलशेट्टीवार, यशवंत कावळे, उल्हास आडे सर, वैद्य सर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता, शहीदांच्या स्मृतीस मानवंदना देणारी व युवकांना प्रेरणा देणारी देशभक्तीची चळवळ ठरली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *