तुमसर तालुक्यात शासकीय सुटीतही जेसीबीने अवैध मुरूम उत्खनन

पर्यावरणाची हानी; दावेझरी- मिटेवाणी शिवारातील प्रकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

तुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्य महामार्गात असलेल्या दावेझरी-मिटेवाणी शिवारातील एक महाकाय नैसर्गिक टेकडी मुरुमाच्या अवैध उत्खननामुळे अक्षरशः पोखरली गेली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीही जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे एकाकाळी जैवविभिधतेने नटलेली ही टेकडी आता जवळपास नामशेष झाली असून, तिच्या केवळ खुणा शिल्लक राहिल्या आहेत. या अनागोंदी कारभारामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून, शासनाच्या महसुलालाही मोठा चुना लागला आहे.

या टेकडीवर उच्च गुणवत्तेचा मुरूम उपलब्ध असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. मागील सुमारे दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने टेकडीचे लचके तोडण्यात आल्याने संपूर्ण परिसराचा भूगोलच बदलला आहे. विशेष म्हणजे, रविवार दिवसदवड्याच्या मुरुमाची अवैध वाहतूक होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुरूम उत्खननासाठी महसूल विभागाचे कडक नियम व परवानगीची निश्चित प्रक्रिया असताना, इतनी मोठी टेकडी उद्ध्वस्त होईपर्यंत प्रशासन नेमके काय करत होते? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तालुका स्तरापासून गावपातळीपर्यंत महसूल व पोलीस यंत्रणा कार्यरत असतानाही वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या अवैध प्रकाराकडे दुर्लक्ष कसे झाले, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

उर्वरित मुरूम नेण्याचा सपाटा सुरूच

टेकडीचा मोठा भाग मुख्यपासून उपटून काढल्यानंतरही माफियांचे बळ कमी झालेले नाही. सध्या उरलेल्या भागातील मुरूमही भरधाव ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने नेला जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थलस्थळी पाहणी करून उत्खनन तात्काळ थांबवावे, उत्खननाचे मोजमाप करून महसुली नुकसानीचा पंचनामा करावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे

मिटेवाणी येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांना उत्खननाबाबत चौकशी करण्यासाठी सांगतो.

— उपेश अंबादे, तहसीलदार तुमसर.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *