
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी :- भंडारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही न घडलेली, धक्कादायक आणि चचेर्चा केंद्रबिंदू ठरणारी घटना नुकतीच घडली आहे. ठाकचंद मुंगूसमारेयांचा महाराष्ट्र विधान परिषद आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत आणि हस्ते भारतीय जनता पार्टीत अधिकृत पक्षप्रवेश झाला. मात्र, या पक्षप्रवेशाला अवघी काही मिनिटेही पूर्ण होण्याआधीच तो रद्द करण्यात आल्याने संपूर्ण भंडारा जिल्हा आणि राज्याच्या राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, भारत देशात भाजपाकडून झालेला हा पहिलाच असा पक्षप्रवेश मानला जात आहे, जो तात्काळ रद्द करण्यात आला. त्यामुळे हा प्रकार केवळ जिल्हा पातळीवर मर्यादित न राहता राज्यस्तरीय राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
ईडीच्या पत्रानंतरच भाजपात प्रवेश?
या संपूर्ण घटनेला वेगळे परिमाण देणारी बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी ठाकचंद मुंगूसमारे यांना ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कडून पत्र मिळाल्याची जोरदार चर्चा परिसरात होती. त्यानंतरच ‘ईडीच्या कारवाईच्या भीतीपोटी ठाकचंद मुंगूसमारे भाजपामध्ये प्रवेश करणार’ अशी चर्चा आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सुरू झाली होती.याच पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश झाल्याने जनतेच्यामनात संशयाची ठिणगी पेटली. ‘ईडीची नोटीस आली की भाजपात प्रवेश केला जातो?’ भाजपामध्ये गेल्यावर चौकशी थांबते का? हेच का क्लीन वॉशचे राजकारण? असे थेट प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.
पक्ष बदलण्याचा प्रदीर्घ इतिहास
ठाकचंद मुंगूसमारे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो सतत पक्षांतरांनी भरलेला असल्याचे स्पष्ट होते. ते सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (घड्याळ चिन्ह) मध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट, पुढे राष्ट्रवादी शरद पवार गट (तुतारी चिन्ह), आणि नंतर शिवसेना शिंदे गट असा प्रवास केला. प्रत्येक वेळी नवीन राजकीय समीकरण, नवीन सत्ता समीप जाण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर निर्माण होणारे वाद असा पक्षांतरांचा सिलसिला सुरूच राहिला. याच दरम्यान ईडीकडून पत्र आल्याची माहिती समोर आली, आणि लगेचच भाजपामध्ये प्रवेश झाल्याने संशय अधिकच बळावला.
भंडारा जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया
या घटनेनंतर आष्टी जिल्हा परिषद क्षेत्र, तुमसर तालुका आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.सामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षक एकाच सुरात म्हणत आहेत. इतके वर्ष पक्ष बदलले, आता ईडीची नोटीस आली आणि भाजपात प्रवेश’ पण काही मिनिटांतच प्रवेश रद्द हे राजकारण नाही तर विनोद झाला आहे!
राजकारण की ‘क्लीन वॉश’ संस्कृती?
ही घटना केवळ एका व्यक्तीचा पक्षप्रवेश रद्द होण्यापुरती मर्यादित नाही, तर देशातील राजकारणात निर्माण झालेल्या ‘क्लीन वॉश’ संस्कृतीवर थेट बोट ठेवणारी आहे. सत्ता, तपास यंत्रणा आणि पक्षप्रवेश यांचा परस्पर संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पक्षप्रवेश झाला मात्र काही मिनिटांतच प्रवेश रद्द! भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात हा प्रकार अभूतपूर्व, धक्कादायक आणि प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे.