
भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सोशल मीडियावर बिबट्याचा वावर अशा प्रकारची खोटी अफवा पसरविणाºया विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी छ.ग. रहांगडाले हे सदर प्रतिनिधीशी बोलतांनी सांगितले. काही दिवसापासून चुल्हाड व सिंदपुरी परिसरात बिबट्याचा वावर या चर्चेने चांगलीच खळबळ उडाली आहे. नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणात वनविभागाने केलेल्या तपासणीत हा प्रकारपूर्ण फेक व फोटो बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर फोटो ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्याचा धक्कादायक खुलासा पुढे आला आहे. बिबट्या भाऊची एंट्री चुल्हाड मध्ये या मथळ्याखाली काही फोटो सोशल मीडियावर वाºयासारखे पसरले आहेत.
दरम्यान सिंदपुरी-चुल्हाड रस्त्यावर एक बिबट्या रस्त्यांने येतांनी दिसत होता. ही फोटो पाहून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. सदर बाब लक्षात घेता याची दखल घेत तुमसर वनपरिक्षेत्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व निरीक्षण केले असता. परिसरात कुठेही बिबट्याच्या पाऊलखुणा किंवा इतर कोणतेही पुरावे मिळाले नाही. तांत्रिक तपासणी अंती, हे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (अक) द्वारे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे नागरिकांमध्ये भीती पसरवणाºया या खोडसाळ प्रकाराची वनविभागाने गंभीर दखल घेतली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले यांनी या प्रकरणातील दोषीं विरुद्ध कठोर व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. ए. आय. जनरेटेड खोटे फोटो बनवून दहशत निर्माण करणाºयांची गय केली जाणार नाही. अफवा पसरवणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही सी. जे. रहांगडाले यांनी सांगितले.