
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. विजया नंदुरकर यांनी भव्य विजय संपादन केला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार भावना भाजीपाले यांचा ५७८ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाची खुर्ची खेचून आणली. नगराध्यक्षपदाची चुरस या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. डॉ. विजया नंदुरकर यांनी पहिल्या क्रमांकाची मते घेत विजय मिळवला, तर भाजपच्या भावना भाजीपाले दुसºया क्रमांकावर राहिल्या. शिवसेना (शिंदे गट) तिसºया क्रमांकावर, तर काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नगरसेवक पदाचे पक्षनिहाय बलाबल नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीने कब्जा केला असला, तरी नगरसेवक संख्येत भाजपने १३ जागांसह आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
पक्षनिहाय विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे: भारतीय जनता पक्ष (१३ जागा) भाजपने सर्वाधिक जागा जिंकून नगरपालिकेत आपले मोठे संख्याबळ कायम राखले आहे. विजयी उमेदवार: भाजपा : विलास काटेखाये, दुर्गा हटवार, भास्कर उरकुडकर, भीमा बावनकर, सुरेश अवसरे, सारिका नंदरधने, त्रिभुवन (सोनु) दंडारे, शहजाद बेग, वर्षा बिलवने, गणेश मुंडले, निकिता मेश्राम, सोनू बावनकर, वंदना नंदागवळी. शिवसेना : शिंदे गट (०४ जागा) वैष्णवी हटवार, सोनू पंचभाई, नामदेव सुरकर, ज्योती तेलमासरे. राष्ट्रवादी काँग्रेस : श. पवार गट (०२ जागा) यादव भोगे, भाग्यश्री गोमासे. अपक्ष (०१ जागा) नीलकंठ टेकाम. पवनी नगरपरिषदेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीमध्ये संमिश्र कल पाहायला मिळत आहे. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले, तरी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून जनतेने डॉ. विजया नंदुरकर यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.