परवानगीशिवाय शेतात केले खोदकाम

भंडारा पत्रिका/सौरभ पारधी नाकाडोंगरी : तुमसर तालुक्यातील मौजा आष्टी परिसरात जलसंपदा विभागाच्या अखत्यारित सुरू असलेल्या कामांदरम्यान शेतकºयांच्या शेतात कोणतीही लेखी परवानगी, नोटीस अथवा हरकत प्रमाणपत्र (ठडउ) न घेता खोदकाम करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कामांमुळे शेतकºयांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतात ये-जा करण्यासाठी वापरल्या जाणाºया पांदन रस्त्यावरही जलसंपदा विभागाकडून खोदकाम करण्यात आल्याने वहिवाटीचा मार्ग बाधित झाला आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष व पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती श्री. शिशुपाल मनीराम गोपाले यांनी भंडारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीनुसार, मौजा आष्टी शेतशिवारात जलसंपदा विभागाच्या कामादरम्यान काही कंत्राटदारांनी ग्रामपंचायत, संबंधित शेतकरी व महसूल विभागाची लेखी परवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले.

या खोदकामामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी साचले, उभ्या पिकांचे नुकसान झाले तसेच पांदन रस्त्यावर झालेल्या खोदकामामुळे शेतकºयांची शेतात ये-जा अडथळ्यांत सापडली आहे. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी श्री. गोपाले यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित कंत्राटदारांना काम थांबविण्याबाबत सांगितले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे.

नुकसानग्रस्त शेतकºयांना अद्याप कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह महसूल, जलसंपदा व पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडेही तक्रारीच्या प्रतिलिपी देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर योग्य कारवाई करावी, नुकसानग्रस्त शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी तसेच पांदन रस्त्यावर जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेले खोदकाम दुरुस्त करून रस्ता पूर्ववत करावा, अशी ठाम मागणी श्री. गोपाले यांनी केली आहे. या तक्रार प्रकरणावेळी तुमसरमोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ कारेमोरे, पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती शिशुपाल गोपाले, माजी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघ सौरभ पारधी, रामेश्वर नागपुरे, अंकित शहारे, भूषण देशमुख, दीपक सोनवाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *