
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सध्याचे सरकार हे विद्यार्थी, पालक व समाजात शिक्षकांविषयी संभ्रमाचे वातावरण तयार करीत असून शिक्षकांना आरोपीच्या पिंजºयात उभे करण्याचे शिक्षक विरोधी षडयंत्र आहे. आॅनलाईन तसेच अशैक्षणिक कामाच्या ओज्याखाली शिक्षकांची कुचंबना होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांना केवळ ज्ञानदानाचेच कार्य करू द्या, अशैक्षणिक कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा, असे लाखांदूर येथील जिल्हा अधिवेशन प्रसंगी आ .सुधाकर अडबाले यांनी प्रतिपादन केले.
उद्घाटक प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य संजय प्रधान, साकोली क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले, माजी जिल्हाध्यक्ष होमराज कापगते, सुधाकर देशमुख, राजेश धुर्वे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनोहर राऊत, नागपुरचे जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, रवींद्र नेताम, जगदीश जुनघरी, धनराज राऊत, लक्ष्मीकांत ओरा, दिलीप गडपल्लीवार, पुरुषोत्तम उरकुडे, महेंद्र भोयर, किशोर पंचभाई, लाखांदूर गटशिक्षणाधिकारी भगवान वरवटे, दारासिंग चव्हाण, प्रभाकर मेश्राम, फारुख शहा, मिलिंद डोंगरे, राधेश्याम मुरकुटे, शमशाद सैय्यद यांचे उपस्थितीत संपन्न झाले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे जिल्हा अधिवेशन रविवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात पार पडले.
यावेळी सरकारच्या कथनी आणि करणीच्या दुटप्पी शैक्षणिक धोरणाचा समाचार घेतला. शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून सदैव शिक्षकांच्या पाठीशी उभा आहे, विमाशि ही लढाऊ संघटना आहे. संकटनेत प्रामाणिक व निष्ठेने काम करा, संघटनेच्या हाकेला प्रतिसाद द्या, असेअडबाले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी वर्षभर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केले. संचलन अरविंद टेम्भूर्णे व रोहिणी हुमे यांनी केले, आभार संजय प्रधान यांनी मानले. यावेळी कार्याध्यक्ष टेकचंद मारबते, उपाध्यक्ष पुरुषोत्तम लांजेवार, धीरज बांते, रंजनकुमार डे, भाऊराव वंजारी, विनोदकुमार मेश्राम, पंजाब राठोड, नरेश रामटेके, कांता कामथे, ज्योती अवचटे, भारती डोंगरे, विजय देवगीरकर, विवेक मोटघरे, अर्चना भोयर, निलीमा मांढरे, संजय भोवते, वंदना आगाशे, चित्रलेखा आकरे, अरविंद पुस्तोडे, मधुकर बोळणे, खेमराज वासनिक, माधुरी मस्के, शालिकराम खोब्रागडे, अशोक गिरी, ज्ञानेश्वर मेश्राम, टिंकेश लांजेवार, जीवनसिंग खासावत, श्रावण नारनवरे इत्यादी जिल्ह्यातील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.