यशदाचा उपचारादरम्यान मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथून जवळच असलेल्या बेला येथे दि. १७ जानेवारी रोजी धक्कादायक व दुदैर्वी घटना उघडकीस आली आहे. दुकानाच्या पायºयावरून जमिनीवर कोसळलेल्या तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यशदा संजय गाढवे रा. बेला असे मृत पावलेल्या तरूणीचे नाव आहे. मृतक ही दि. १५ जानेवारी रोजी सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. अचानक ती पायºयावरून जमिनीवर पडली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाली. जखमीला उपचाराकरीता नागपूरला हलविण्यात आले. तेथे एका खाजगी रूग्णालयात तिचेवर उपचार सुरू असतांना १७ जानेवारी रोजी सायं. ४ वाजता प्राणज्योत मालवली. मृतक यशदा ही १२ व्या वर्गात शिकत होती. परिवारात एकुलती एक होती. माजी जि.प. सभापती संजय गाढवे यांची मुलगी असून तिच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *