
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजना तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण योजना या शेतकरी हिताच्या व जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ११.०० वाजता जिल्हा नियोजन समिती, भंडारा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक/सचिव तसेच अशासकीय संस्था यांना विशेषत: उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यशाळेमध्ये तलाव व धरणांतील गाळ काढण्याची प्रक्रिया, तो गाळ शेतकºयांच्या शिवारात टाकण्याचे फायदे तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणातून शेती व पाणी व्यवस्थापन कसे अधिक सक्षम होऊ शकते याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेली सुपीक माती उपलब्ध होऊन पिकांची गुणवत्ता व उत्पादन वाढीस मदत होते. तसेच जलसाठवण क्षमतेत वाढ होऊन पावसाचे पाणी वाया न जाता भूजल पातळी सुधारण्यास मोठा हातभार लागतो. परिणामी भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता या योजनांमध्ये आहे.