चोरीच्या घटनांनी तुमसर शहर हादरले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : चोरीच्या घटनांनी तुमशहर हादरून गेले आहे.तुमसर शहरातील नामांकित सात दुकानांना सेंद लावून चोरट्यांनी रोख रक्कम व दुकानातील वस्तू लंपास केल्याची खळबळ जनक घटना आज दि.९ एप्रिल रोजी उघडकीस आली.या घटनेमुळे तुमसर पोलीसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

तुमसर शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील मुख्य बाजार परिसरातील दादलानी लाईफ स्टाईल कापड दुकान,आॅल ईन वन मोबाईल दुकान,गुरुनानक एन एक्स कलेक्शन दुकान,वेराईटी मोबाईल दुकान,समरीत अनाज दुकान,शिवालय कापड दुकान अशा सात दुकानांचे शटर तोडून चोरांनी २,११,७०० रुपये रोख रक्कम व सामाना वर हात साफ करून पळ काढला. ही घटना दिनांक ९ एप्रिल च्या मध्य रात्री घडली असुन सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. अज्ञात इसमा विरुद्ध तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस ठाण्याचा जवळील मुख्य बाजार परिसरात चोरांनी धुमाकूळ माजविल्याने शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनतेच्या सुरक्षेबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *