
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील प्रसिद्ध खेळाडू संतोष ब्रम्हानंद बंधाटे यांनी ३२ व्या आॅल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग (ज्युनियर, सिनियर व मास्टर) स्पर्धा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. ही स्पर्धा दिनांक १२, १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथे पार पडली. संतोष बंधाटे यांनी मास्टर-१ गटात १०० किलो बॉडीवेट प्रकारात एकूण ४४० किलो वजन उचलत गोल्ड मेडल मिळविले. त्यांनी बेंच प्रेसमध्ये १२० किलो, डेडलिफ्टमध्ये १७० किलो आणि स्क्वॅटमध्ये १५० किलो वजन उचलून तुमसर, देव्हाडी तसेच महाराष्ट्र राज्याचा मान उंचावला. त्यांनी महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व केले.
संतोष बंधाटे हे अदानी पॉवर प्लांट, तिरोडा येथे रळऋ सेक्युरिटीमध्ये कार्यरत असून, ८ तास नोकरी सांभाळून दररोज अडीच तास जिममध्ये कठोर सराव करतात. त्यांच्या या जिद्दी आणि मेहनतीमुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल अदानी पॉवर प्लांटचे सेक्युरिटी हेड सूर्यकांत कश्यप सर, सिनियर मॅनेजर प्रदीप यादव सर, असिस्टंट मॅनेजर हरीश ख्यानी सर, ज्युनियर मॅनेजर धीरज जोशी सर तसेच भंडारा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सिंग, सेंटर पॉईंट क्लबचे संचालक अॅड. प्रमोद इलमे, अॅड. विजय गणेशे, डॉ. पंकज भाऊ कारेमोरे, सतिष बंधाटे, कमलेश दमाहे, संतोष बोहने, तुमसर निधी बँकेचे संचालक अरविंद थोटे तसेच शैलेश रोडगे, सत्यम नंदागवळी, सचिन मेश्राम, योगेश कांबळे, योगेश धारंगे, निलेश काटकर, प्रकाश उमरकर यांनीही शुभेच्छा दिल्या. एम.एस.एफ. सेक्युरिटीचे र.ड. नरेंद्र सुशाहुत यांनीही संतोष बंधाटे यांचे विशेष अभिनंदन केले. संतोष बंधाटे यांच्या या यशामुळे तुमसर परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.