
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक होत असल्याने या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्याकरिता तहसीलदार ठाकरे यांनी तयार केलेल्या भरारी पथकाचे मंडळ अधिकारी पी.बी.निमजे ,ग्राम महसूल अधिकारी बि.डी. पटले, आनंद भूते व इतर हे २२ रोजी संध्याकाळी ६ वाजता दरम्यान सरांडी परिसरात गस्तीवर असताना त्यांना सरांडी मुख्य मार्गाने टिप्पर क्रमांक एम एच ४० वाय १६१६ येताना दिसला. पथकाने टिप्पर थांबवून टिपरची पाहणी केली असता या टिप्पर मध्ये मुरूम भरून असल्याचे दिसल्यावरून त्यांनी चालकास गाडी मालक व त्याचे नाव गाव व मुरूम वाहतुकीचा परवाना विचारला असता टिप्पर चालकाने आपले नाव राहुल साठवणे रा.सरांडी व टिप्पर आकाश कडकडे खैरबोडी यांचा असल्याचे सांगून मुरूम वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर मुरूमचे अवैधरित्या वाहतुक होत असल्याचे सिध्द झाल्याने सदर टिप्पर तिरोडा तहसील कार्यालया त आणून जमा केला. तिरोडा तहसीलदार एन. एम. ठाकरे यांचे मार्गदर्शनात पुढील कार्यवाही सुरू आहे.