वृद्ध पहारेकºयाची निर्घृण हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे एका वृद्ध पहारेकºयाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गावाच्या वेशीबाहेरील जंगलाने वेढलेल्या निर्मनुष्य परिसरात घडल्याने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीची ओळख महादेव शंकर कामठे (वय ६७) अशी झाली असून ते गावाबाहेरील वाहिद कुरेशी यांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रावर (पोल्ट्री फार्म) पहारेकरी म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली.

घटनेच्या वेळी परिसरात अन्य कोणीही नसल्याने आरोपींना गुन्हा करण्यास संधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. सकाळी घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गोबरवाही पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी (तुमसर), फॉरेन्सिक पथक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व पथके एकत्रितपणे पुरावे गोळा करून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

परिसरात भीतीचे वातावरण

या निर्घृण हत्येनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिसांनीही गुन्ह्याचा लवकरच उलगडा करून दोषींना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *