
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा गावातील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच विकराळ रूप धारण केलेल्या या आगीत वर्गखोलीतील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी शाळेत विद्यार्थी उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वर्गखोलीत सरपण साठवून ठेवण्यात आले होते. बाहेरील तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना तीव्र उष्णतेमुळे किंवा अन्य कारणामुळे सरपणाने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्यानंतर काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण वर्गखोली वेढली आणि धुराचे लोळ आकाशात उसळू लागले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली. अग्निशमन दल पोहोचण्यासविलंब होणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत खाजगी मोटर पंप, पाण्याच्या टाक्या व उपलब्ध साधनांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्परतेमुळे आग इतर वर्गखोल्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
अतिउष्णतेमुळे सरपणाने घेतला पेट?
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वर्गखोलीत सरपण साठवून ठेवण्यात आले होते. बाहेरील तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना तीव्र उष्णतेमुळे किंवा अन्य कारणामुळे सरपणाने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्यानंतर काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण वर्गखोली वेढली आणि धुराचे लोळ आकाशात उसळू लागले.
ग्रामस्थांची तत्परता आणि बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली. अग्निशमन दल पोहोचण्यास विलंब होणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत खाजगी मोटर पंप, पाण्याच्या टाक्या व उपलब्ध साधनांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्परतेमुळे आग इतर वर्गखोल्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
शैक्षणिक साहित्याची राख; प्रशासनाकडे मागणी
या आगीत वर्गखोलीतील बाके, टेबल, शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून नष्ट झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामीशाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गजानन डोंगरवार यांनी नुकसानग्रस्त वर्गखोलीच्या जागी तात्काळ नवीन वर्गखोली उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर शाळांमधील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ज्वलनशील साहित्य साठवून न ठेवणे, विद्युत यंत्रणांची नियमित तपासणी करणे आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. झरपडा येथील ही घटना सावधतेचा इशारा देणारी ठरली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.