
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- बाप का, भाई का बदला लेगा रे तेरा फैजल’ गँग आॅफ वासेपूर नावाच्या सिनेमातला डायलॉग चांगलाच गाजला होता. आता या सिनेमासारखीच एक घटना गोंदियामध्ये घडली आहे. वडिलांचा खून करणाºया मारेकºयाची एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या मारेकºयाचा मुलाने खून केला आहे. तलवारीने सपासप वार करून वडिलांच्या हत्येचा बदला घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी इथं ही घटना घडली आहे. जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची तलवारीने निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.
भुरु उर्फ देवेंद्र ताराम (२५) असं हत्या करण्यात आलेले तरुणाचं नाव आहे. तर सुनील कांबळे असं आरोपीचं नाव आहे. ९ महिन्यांपूर्वी मृतक देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम याने आरोपी सुनील कांबळे याचे वडील आसाराम कांबळे (वय ६०) याची जादूटोणाच्या संशयातून हत्या केली होती. मृतक आसाराम कांबळे हे गावाजवळील जंगल शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले असता सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत घरी परतले नाही. तर शेळ्या मात्र घरी आल्याने आसारामच्या कुटुंबीयांनी गावकºयांसह जंगलाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना आसाराम यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना जंगल शिवारातील असल्याने आणि आसारामच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्याने प्रथमदर्शनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्याच्या मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करत गावकºयांनी घटनेची माहितीगोरेगाव वन विभागाला दिली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार घातपाताच्या असल्याचं दिसून आलं. यावर त्यांनी गोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ घाटून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला.