
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत येणारे सर्रा गावात अवैध दारूमुळे गावातील शाळकरी मुलेही दारुच्या आहारी जाऊन गावातील वातावरण बिघडत असल्याने सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष व गावकºयांनी गावात दारूबंदी करण्यासाठी ठराव घेऊन दारूबंदी समिती निर्माण करून ग्रामपंचायतच्या ठरावासह माहिती तिरोडा पोलीस स्टेशन व संबंधितांना देऊनही दारू विक्रेत्यांवर कार्यवाही न होता दारूबंदी समितीवर खोटे गुन्हे दाखल करून सध्या सर्रास दारू विक्री होत असल्याने गावातील वातावरण बिघडून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असल्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांचे नावे गावकºयांनी पोलीस निरीक्षक तिरोडा यांना व संबंधित अधिकाºयांना दिले असल्याची माहिती सर्रा वासीयांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
आज दिनांक १ मार्च रोजी तिरोडा येथे झालेले पत्रकार परिषदेत सर्रा येथील सरपंच सिद्धार्थजी कांबळे, दारूबंदी अध्यक्ष अरुणाबाई उईके, ग्रामपंचायत सदस्य व गावकºयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे गावातील शाळकरी मुले व इतर व्यक्ती दारू पिऊन घरी व इतर ठिकाणी वाद विवाद करीत असल्याने तसेच गावाचे बस स्टॉप जवळ काही दारू पिणारे व्यक्ती या बस स्थानकावरून शाळेत व इतर ठिकाणी जाणारे शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी व महिलांसमोर अश्लील हावभाव करून शिवीगाळ करीत असल्याने गावात तणावपूर्ण वातावरण होत असल्यावरुन ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकºयांनी सभा घेऊन गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेऊन ८ आॅक्टोंबर २०२५ रोजी गाव दारूबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून पोलीस स्टेशन तिरोडा व इतर संबंधितांना देऊनही गावात पोलिसांतर्फे दारू विक्रेत्यांवर कार्यवाही न करता दारूबंदी समितीचे सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून अवैध दारू विक्री काही प्रमाणात छूप्या पद्धतीने विक्री सुरू होती,
मात्र आता परत खुलेआम मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे १०० मीटर चे जवळपास अंतरावरच अवैधरित्या दारू विक्री होत असून यामुळे गावात परत वाद विवाद होऊन गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी गोंदिया यांचे नावे निवेदन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तिरोडा अमित वानखडे यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती जवळपास १०० गावकºयांच्या सहीनिशी सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर, पोलीस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, उपविभागीय अधिकारी तिरोडा, तहसीलदार तिरोडा, आबकारी विभाग गोंदिया यांना देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.