
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल पटेल यांच्या आशीर्वादाने महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते राजेंद्र जैन यांना महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार पदाकरीता उमेदवारी जाहिर झाली असुन त्यांचा आज नामांकज अर्ज भरण्यात आला. यावेळी खासदार सुनिल तटकरे, ना. छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार, ना. इंद्रनिल नाईक, ना. दिलीप वडसे पाटील, ना. आशिष शेलार, ना. भरत गोगावले आमदार राजकुमार बडोले, आमदार राजुभाऊ कारेमोरे आदि उपस्थित होते. राजेंद्र जैन यांना राज्यसभा खासदार पदाच्या उमेदवारी मिळाल्याने भंडारा जिल्हा राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षातर्फे जिल्हा कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला.
या निर्णयातून पक्ष नेतृत्वामध्ये आजही प्रफुल पटेल यांचे प्रभावी स्थान कायम असल्याचे संकेत मिळाले. राजेंद्र जैन यांना खासदार पदाची उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल व पक्ष अधीक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राजेंद्र जैन यांच्या राज्यसभा खासदार पदाच्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षा श्रीमती सरिता मदनकर, महेंद्र गडकरी, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, सभापती आनंद मलेवार, डॉ. रविंद्र वानखेडे आपले मत व्यक्त केले. तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर यांनी केले.
यावेळी राजु सलाम पटेल, डॉ. जगदिश निंबार्ते, सदाशिव ढेंगे, शेखर (बाळाभाऊ) गभने, महादेव पचघरे, हितेश सेलोकर, सोनु खोब्रागडे, सौ. शुभांगी खोब्रागडे, कृष्णा उपरीकर, आरजू मेश्राम, संजय सतदेवे, राजु शक्तीकर, भारत लांजेवार, जवाहरनिर्वाण, अरुण अंबादे, प्रभाकर बोदेले, रुपेश खवास, अरुण भेदे, लोकेश नगरे, अमन मेश्राम, मंगेश रेहपाडे, रवी लक्षणे, सारंग घारगडे, सुभाष तितिरमारे, राजु सतदेवे, किर्ती कुंभरे, संजय सतदेवे, धनवंता बोरकर, शैलेश पशीने, अंकुश चुटे, निरज शहारे, मदन भुरले, खुशाल निपाने, वेद सारुलकर, रेखा मेंढे, सुनिल मोगरे, रविंद्र पवनकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.