जिल्ह्यात रेती माफियांवर मोठा घाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलीस व महसूल विभागाने एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाया करत रेती माफियांना मोठा दणका दिला आहे. करडी, पालांदुर, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ४० लाख ३६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा ट्रॅक्टर-ट्रॉली, रेती आणि उत्खननासाठी वापरली जाणारी साधने पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात वाढत्या अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रांचे नुकसान होत असताना पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवत सलग कारवाया केल्या. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणलेअसून अवैध उत्खनन करणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *