कार अपघातात एकाचा मृत्यू , दुसरा जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भरधाव कारवरील नियंत्रण सूटल्याने झालेल्या अपघातात एकातरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. सदर घटना सोमवार, २२ रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास भंडारा-खात रोडवरील गुंजेपार फाटा परिसरात घडली. रोहित प्रदीप शर्मा (२५) रा. सिव्हिल लाईन भंडारा असे मृत तरुणाचे नाव आहे. तर हरीश खुशाल सूर्यवंशी (३२) रा. प्रगती कॉलनी भंडारा हा जखमी झाला.

हरीश सुर्यवंशी व रोहित शर्मा हे गुंजेपार येथील हॉटेलमधून कारने घरी जाण्याकरिता निघाले होते. यावेळी रात्री दीड वाजताच्या सुमारास गुंजेपार फाटयाजवळ रोहीतचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली पलटले. यात रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बाजूच्या सीटवर बसलेला हरीष हा थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वानखेडे करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *