सानगडी हादरले; शालेय मुलींना चाकूचा धाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : सानगडी परिसरात मागील काही दिवसांपासून अज्ञात इसमांकडून शालेय लहान मुलींना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखविला जात असल्याच्या गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. तोंडाला काळा मास्क बांधून फिरणारे ३ ते ५ इसम केवळ मुलींनाच लक्ष्य करत असल्याचे समोर येत असून, या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पंडित नेहरू विद्यालयाने साकोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सानगडी हे परिसरातील महत्त्वाचेशैक्षणिक केंद्र असून येथे इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे.

जवळपास १० ते १५ गावांतील सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी पायी, सायकलने, तर काही बसने येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. बाहेरगावाहून जंगलमार्गे येणाºया मुलींना अधिक धोका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गावाबाहेरील सुनसान रस्त्यांवर अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याने चिंता वाढली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे अज्ञात इसम चॉकलेटचे आमिष दाखवून ‘गाडीत बसा, ओरडायचे नाही’ असे म्हणत चाकू लावून धमकावत असल्याचे मुलींनीच सांगितले आहे. जि.प. प्राथमिक शाळा क्रमांक २ मधील वर्ग तिसरीच्या तीन मुली, पंडित नेहरू विद्यालयातील पाचवीच्या दोन मुली तसेच जि.प. हायस्कूलमधील पाचवीच्या एका मुलीसोबत हा थरार घडल्याची माहिती आहे. त्यामुळे हा प्रकार अफवा नसून प्रत्यक्ष घटनांवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *