
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे विषय समित्यांच्या निवडीसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, दुसरीकडे प्रशासकीय सोयीसाठी मुख्याधिकारी पदाच्या जबाबदारीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निर्णयप्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये असल्याचे चित्र आहे.
मुख्याधिकारी वैद्यकीय रजेवर; जुम्मा प्यारेवाले सांभाळणार धुरा
तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे २० जानेवारी ते ३फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले आहेत. नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी तातडीने आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार, भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्याकडे तुमसर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून, त्यांना सर्व प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
२७ जानेवारीला ‘विशेष सभा’; विषय समिती निवडीचा कार्यक्रम जाहीर
प्रशासकीय बदलांसोबतच नगरपरिषदेत आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार, स्थायी समितीचेगठन तसेच विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी २७ जानेवारी २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यातआले आहे.