
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांइतकीच आता ‘वीज आणि मोबाईल’ ही मानवाची अपरिहार्य गरज बनली आहे. प्रवासात किंवा दुर्गम भागात मोबाईल चार्जिंगसाठी विजेची मोठी समस्या भेडसावते. यावर उपाय म्हणून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील पी एम श्री जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शिक्षिका वृत्तिका आलोने यांनी ‘पिजो इलेक्ट्रिक इफेक्ट’वर आधारित एक अनोखा ‘बुट’ तयार केला आहे. या बुटाच्या मदतीने चालता-चालता वीज निर्मिती होऊन मोबाईल चार्ज करता येणार आहे.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत या प्रयोगाची सध्या सर्वत्रचर्चा होत आहे. भौतिकशास्त्रातील ‘पिजो इलेक्ट्रिक इफेक्ट’ ही संकल्पना अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सुलभतेने समजावी, या उद्देशाने हा प्रयोग विकसित करण्यात आला. विशेष म्हणजे, शिक्षिकेने शाळेच्या प्रयोगशाळेतील साहित्याचा वापर करूनच हे मॉडेल साकारले आहे. बुटाच्या तळव्याच्या भागात अनेक ‘पिजो इलेक्ट्रिक प्लेट्स’ची एकसर व समांतर जोडणी करण्यात आली आहे.
व्यक्ती जेव्हा हे बुट घालून चालते, तेव्हा जमिनीवर पडणाºया दाबामुळे या प्लेट्समधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. तयार झालेली ही वीज एका बॅटरीमध्ये साठवली जाते, ज्याचा वापरकरून नंतर मोबाईल चार्ज करता येतो. हा प्रकल्प पूर्णपणे प्रदूषणरहित आणि कमी खर्चात तयार होणारा आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा दुर्गम भागात जिथे वीजउपलब्ध नाही, तिथे सैनिकांसाठी हे बुट अत्यंत उपयुक्त ठरतील. वीजपुरवठा नसलेल्या क्षेत्रातील लोकांसाठी हा ऊजेर्चा शाश्वत स्रोत ठरू शकतो. चालण्यासोबतच आपली उपकरणे चार्ज करण्याची सुविधा सामान्य माणसालाही मिळेल.