वनजमीनीतुन मुरूमाचे अवैध उत्खनन, पोकलँडसह ३ टिप्पर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील सावरला परिसरातील वनविभागाच्या जागेतुन अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन व वाहतुक करणाºया वाहनांवर वनविभागाने कारवाई करीत १ पोकलँड व ३ टिप्पर जप्त केले. पवनी वन क्षेत्रसहायक श्री.काटेखाये व बिटरक्षक नागरगोजे हे आज दि.६ जानेवारी रोती सकाळी साडे दहा वाजेच्या प्रादेशिक प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र सावरला परिसरातील गुडेगाव बिट परिसरात गस्त घालत असतांना मौजा गुडेगाव, कक्ष क्रमांक २३८ संरक्षित वन येथील जंगलामध्ये पोकलैंडव्दारे गौण खनिज ाचे (मुरुम) अवैध खोदकाम करून ट्रकने वाहतूक करीत असल्याचे दिसुन आले.

त्यांनी सदर माहिती पवनी वरिष्ठांना दिली असता श्रीमती व्हि. के. नागदेवे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांनी सदर ठिकाण गाठुन मौक्यावर पोकलॅन्ड मशीन व ३ टिप्पर मुददेमाल जप्ती केले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २. ३३(१) व ५२ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढिल तपास श्रीमती व्हि. के. नागदेवे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी, हे करीत आहेत. वनपरिक्षेत्रातील वनालगत अवैध खोदकाम, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड व अवैध शिकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजीकच्या वनअधिकारी व वनकर्मचारी यांना कळव- ावे किंवा फॉरेस्ट हेल्प लाईन क्रमांक १९२६ वर तात्काळ कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांनी केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *