तीन गोतस्करांवर कारवाई ; एकास अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव ते गिरोला दरम्यान ६ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कत्तलखान्याकडे गोवंश नेणाºया तीन आरोपींवर कारवाई केली. यातील एक आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध पोलिसघेत आहेत. या कारवाईत १३ गोवंशांची सुटका करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना घटेगाव ते गिरोला या मार्गाने जनावरांची कत्तलखान्याकडे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर मार्गावर पाळत ठेवली. दरम्यानएका संशयास्पदरित्या येणाºया वाहनाला थांबण्याचा इशारा केला. वाहन थांबताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करूनएका आरोपीला ताब्यात घेतले. तसेच वाहनातील २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १३ गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन जप्त करून आरोपी आशिष पाखमोडे (३५), दुर्गेश हिरदयालसिंग राजपूत (३५) व मयूर उर्फ मर्डर सर्व रा.मुरमाडी ता. लाखनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *