भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
गोंदिया :- सण-उत्सवांची परंपरा जपत पर्यावरणचे संवर्धन करण्याचा अनोखा संदेश गोंदिया शहरातील श्रीनगर परिसरातील महिलांनी दिला आहे. महिलांनी एकत्र येत इको फ्रेंडली गौरींची स्थापना करून पारंपरिक गाणी गात गौरी पूजन केले. यावेळी महिलांच्या उत्साहाला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्याचे पाहायला मिळाले. ‘आम्ही जागरूक महिला, करूया इको फ्रेंडली हरितालिका!’ असा संकल्प घेत श्रीनगर परिसरातील महिलांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गौरी पूजन केले.
पारंपरिक पद्धतीने गौरीचे स्वागत करून महिलांनी गौरीची गाणी आणि मंगलगीते गात पूजा-अर्चना केली. यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, महिलांनी कृत्रिम गौरींची स्थापना करत पर्यावरणला हानी पोहोचविणाऱ्या वस्तूंचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला. गौरी पूजनाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा जपत पर्यावरणचे संरक्षण कसे करता येते, याचा आदर्श या महिलांनी घालून दिला. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पंचतत्वांच्या रक्षणचा संदेश देत हा उपक्रम राबवण्यात आला. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांचे संवर्धन करणे ही प्रत्येकानी जबाबदारी आहे. त्यामुळे सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे असल्याचे महिलांनी या उपक्रमातून सांगितले.
गौरी पूजनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिलांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजાગृती करण्याचा संकल्पही केला. सण साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. धार्मिक परंपरा, महिलांचा उत्साह आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम श्रीनगरत पाहायला मिळाला.
गौरीची गाणी गात, एकोप्याने पूजा-अर्चना करत महिलांनी दिलेला हा इको फ्रेंडली संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार घराघरा्रांत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला असून, परंपरा जपत निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे, असा संदेश श्रीनगरतील महिलांनी दिला.