‘हिट अँड रन’ प्रकरणाचा आरोपी ४८ तासांत पोलिसांच्या ताब्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तीन दिवसापूर्वी पेपर वाटपासाठी गेलेल्या शंकर भोजलाल पटले (४५) यांच्या दुचाकीला धडक देऊन पळ काढणाºया मेटाडोरचा शोध घेण्यात अखेर ४८ तासांनंतर पोलिसांना यश आले. या अपघातामध्ये पटले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी मेटाडोरमालक मोहाडी येथील आकाश एकनाथ मोटघरे (नेहरू वार्ड) याला आणि चालकाला ताब्यात घेऊन वाहनही पोलिसांत जमा करण्यात आले. या अपघातप्रकरणी शंकर पटले यांच्या पत्नीने भंडारा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ते वृत्तपत्र वाटपाचे काम करायचे. शहरात पेपर वाटप करण्यासाठी ते एमएच ३६/एएस २४७० क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. परत येताना राष्ट्रीय महामार्गावरील चोले हॉस्पिटलजवळ नागपूरकडून भंडाºयाकडे येणाºया भरधाव मेटाडोरने धडक देऊन पळ काढला होता.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६ (१), सहकलम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. धडक देऊन पळ काढलेल्या मेटाडोरच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान होते. गुन्हे अन्वेषण शाखेचे इंचार्ज सहायक पोलिस निरीक्षक राजेश खंदाडे, सहायक फौजदार तुळशीदास मोहरकर, शिपाई अमोल मस्के, शेषराव राठोड, कोमल ईश्वरकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता पळून गेलेला मेटाडोर हा आयसर कंपनीचा असून, कथ्या रंगाचा असल्याचे व त्याचा क्रमांक एमएच ३६/एफ ४८५१ असल्याचे दिसून आले. या माहितीवरून तपास घेतला असता हे वाहन मोहाडी येथील आकाश एकनाथ मोटघरे यांचे असल्याचे समजले. त्यावरून पथकाने मोहाडी येथे जाऊन वाहन मालक, चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुधे तसेच भंडारा डीबी पथकातील कर्मचारी करीत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *