४८ भजनी मंडळांतील ४३३ कलावंतांनी गाजवला भजन सप्ताह

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : वाचनालय भंडाºयाच्या अभिनव भजन सप्ताहात ४८ भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे यातील ३८ भजनी मंडळ हे महिलाचे भजनी मंडळ होते. दहा वर्षीय आशीता चौधरी व वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण करणारे भजनी मंडळ हे या भजन सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरले. सार्वजनिक वाचनालय भंडाराचे अध्यक्ष धनंजय दलाल व कार्यवाह प्रा.सुमंत देशपांडे तसेच कार्यकारणी मंडळाच्या संकल्पनेतून ही अभिनव भजन सप्ताहाची संकल्पना राबवण्यात आली. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध माध्यमांनी विशेष भूमिका बजावली. प्रसिद्धीमुळे भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यातील तब्बल ४८ भजनी मंडळांनी यात सहभाग नोंदवला.

भजनी मंडळांनी पारंपारिक वाद्यापासून ते अत्याधुनिक वाद्यांचा सहभाग घेतल्याचे दिसून आले. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने भजनाचे सादरीकरण करणाºया मंडळात बालपुरी भजन मंडळ राणी लक्ष्मीबाई वार्ड भंडारा, गुरुदेव सेवा भजन मंडळ गणेशपुर, जय श्रीराम भजन मंडळ भंडारा, राधेय महिला भजन मंडळ खात रोड भंडारा, महाशक्ती भजन मंडळ भंडारा, सद्गुरु लहरी भजन मंडळ भंडारा, सिद्ध चिंतामणी महिला भजन मंडळ सहकार नगर भंडारा यांचा सहभाग होता. या सर्व भजनी मंडळात सर्वाधिक सहभाग तरुणी व महिलांचा होता हे विशेष. दहा वर्षीय आशीता चौधरी हिने सादर केलेले भजन सर्वांना भावले. भविष्यातील भजनकारांची पिढी घडत असल्याचे दिसून आले. भंडारा जिल्ह्यातून वैशिष्ट्यपूर्ण भजन सादर करणारे संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळतील असे या भजन सप्ताहातून दिसून आले या. अभिनव उपक्रमाच्या कौतुकासाठी सिद्धयोगाचार्य भाऊमहाराज निटुरकर, ख्यातनाम प्रवचनकार दिलीप महाजन, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, रामविलास सारडा, व्दारकाप्रसाद सारडा, डॉ. रोमी बिष्ट तसेच भंडारा शहरातील दैनिकांच्या प्रतिनिधींनी आपला वेळ देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ.मधुरा मदनकर या होत्या.

विशेष अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सौ. विशाखा गुप्ते, सौ.दुर्गा डोरले, माजी नगराध्यक्ष रामदास शहारे, माजी न.प. उपाध्यक्ष संजय कुंभलकर, व्यावसायिक राहुल अन्नपूर्णे, हेमंत महाकाळकर, नगरसेवक आशू गोंडाने, सौ. ब्राह्मणकर, सौ. नेवारे, कलावंत समितीचे प्रमुख महेंद्र वाहणे, लॉ. अजय कारेमोरे उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी दरवर्षी भजन सप्ताहाचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा करुन भविष्यात भंडारा जिल्ह्याच्या कलावंतांना कला सादरीकरणासाठी ईंद्रराज सभागृह उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले. या संपूर्ण भजन सप्ताहाचे संचालन प्रा.सुमंत देशपांडे, डॉ. प्रकाश मालगावे यांनी केले. भजन सप्ताहाच्या आयोजनासाठी सहकार्यवाह हर्षल मेश्राम, शेखर गभने, धनंजय ढगे, गुरुप्रसाद पाखमोडे, नीलकंठ रणदिवे, विनोद आकरे, सौ.मंगला निंबार्ते, मंगला भोले, सौ.प्रीती कढव, अविनाश पाठक, रासेगावकर, उद्धव डोरले, ईश्वरलाल काबरा, प्रा.नरेश आंबिलकर, घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, सुधीर खोब्रागडे, युवराज साठवणे, मारोती वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *