
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील भंडारा,तुमसर,पवनी व साकोली-सेंदुरवाफा या चार नगर परिषदांच्या उपाध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया आज दि.१६ जानेवारी रोजी पार पडली. त्यात भाजपने एकतर्फी विजय मिळविला असुन भंडाºयात चंद्रकला भोपे, तुमसर सचिन बापचे,पवनी सोनु बावनकर तर साकोलीमध्ये रोहिणी मुंगुलमारे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भंडारा व साकोली नगर परिषदेत भाजप,तुमसरात अपक्ष तर पवनी नगर परिषदेत राष्टÑवादी कॉंगे्रस अ.प. पक्षाने विजय मिळविला.
भंडारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या चंद्रकला भोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ जानेवारीला पार पडलेल्या नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने चिंद्रकला भोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तब्बल ४६ महिन्यांपासून भंडा- रा नगर परिषदेवर प्रशासक राज होता. भंडारा नगर पालिकेत ३५ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाकरिता २ व २० डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला.त्यात भंडारा नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या मधुरा मिलींद मदनकर या विजयी झाल्या.
३५ नगरसेवक संख्या असलेल्या भंडारा नगर परिषदेत भाजपचे सर्वाधीक २३ नगरसेवक निवडुन आले तर शिवसेना शिंदे ५, काँग्रेस ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अ.प. ३ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. भंडारा नगर परिषदेत भाजपचे सर्वाधीक नगरसेवक निवडुन आल्यानेउपाध्यक्ष भाजपचाच होणार हे निश्चित होते.त्यानुसार चंद्रकतला भोपे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच भाजपने भाजपचे भंडारा शहर अध्यक्ष सचीन कुंभलकर,चैतन्य उमाळकर व अॅड.केलश भुरे यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड केली. तर राष्टÑवादी कॉंगे्रस अ.प.पक्षाचे माजी नगराध्यक्ष अॅड.विनयमोहन पशिने यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश घेत स्वत:ची शिवसेनेच्या वतीने स्विकृत सदस्यपदी वर्णी लावुन घेत सर्वांनाच अश्चर्याचा धक्का दिला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्षा मधुरा मदनकर व मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेच्या आवारात मोठी गर्दी होती. विजयानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गांधी चौकात फटाके फोडले आणि गुलाल उधळला. विश्रामभवनात आ. डॉ .परिणय फुके यांनी भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाºयांचे अभिनंदन केले.