
भंडारा पत्रिका/गोवर्धन निनावे भंडारा : दि. १६ जानेवारीला भंडारा नगरपरिषदेतील उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांची निवड करण्यात आली. मात्र भंडारा शहरातील न.प. निवडणुकीसाठी भाजपचे किंगमेकर मानले जाणारे जॅकी रावलानी यांचे नाव त्या यादित नव्हते.
या पुर्वी भंडारा-पवनी विधानसभा निवडणुकीत भंडारा शहरातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी किंगमेंकर म्हणून ओळखले जाणारे जॅकी रावलानी यांनी भंडारा-पवनी विधानसभेत शिवसेनेला बहुमताने विजय मिळवून दिला होता, त्यानंतर निवडणकीच्या तोंडावर जॅकी रावलानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व नगरसेवक म्हणून भंडारा नगरपरिषदेची निवडणूक लढली व सोबत स्टार प्रचारक म्हणून भंडारा शहरातील नगराध्यक्षा सहित संपूर्ण नगरसेवकांना निवडून आणण्याकरीता मेहनत घेतली. त्यात भाजपच्यानगराध्यक्षासह २३ नगरसेवकही निवडून आले, मात्र या निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आज दि. १६ जानेवारीला भंडारा शहरातील उपाध्यक्ष म्हणून चंद्रकला प्रेमलाल भोपे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून सचिन कुंभलकर, चैतन्य उमाळकर, कैलास भुरे यांची निवड करण्यात आली. मात्र भंडारा नगर परिषदेतील जनतेसाठी व भाजपसाठी किंगमेकर असलेले जॅकी रावलानी यांची निवड का करण्यात आली नाही. भंडारा शहरातील किंग मेकर जॅकी रावलानी यांचा राजकारणात गेम तर नाही झाला ना? असा भंडारा शहरातील लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.