
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी नगर परिषदेच्या आज दि. १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे सोनु बावनकर यांची बिनविरोध निवड झाली. स्विकृत सदस्यांमध्ये भाजपच्या भावना भाजीपाले व शिवसेना शिंदे पक्षाचे देवराज बावनकर यांची निवड करण्यात आली. पवनी नगर परिषदेत भाजप १३, शिवसेना शिंदे ४, राष्टÑवादी कॉंग्रेस अ.प. २ व अपक्ष १ नगरसेवक निवडुन आले आहेत.