लाचखोर सेवाकर अधिकारी जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणाºया वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांनी लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात अटक केली. मनीष मुरलीधर सहारे (५०) असे लाचखोर अधिकाºयाचे नाव आहे. तक्रारदार (३६) यांचा जीएसटी क्रमांक आॅक्टोबर २०२५ पासून बंद होता. तो पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी ॅ२३.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज केला होता. जीएसटी विभाग, नागपूर येथून लेझर शीट तयार करून त्यानुसार चालान भरण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने १० हजार ४२८ रुपये इतकी रक्कम आॅनलाईन भरली.

यानंतर जीएसटी क्रमांक सुरू न झाल्याने तक्रारदाराने जीएसटी विभाग, भंडारा येथील अधिकारी मनीष सहारे यांची भेट घेतली. यावेळी आरोपी अधिकाºयाने जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्यासाठी ३५,००० रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी एसीबी भंडारा येथे तक्रार दाखल केली. दि. १६ जानेवारी २०२६ रोजी पंचासमक्ष पडताळणीदरम्यान आरोपीने ३५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची स्पष्ट मागणी व सहमती दर्शवली. त्यानंतर दि. २० जानेवारी रोजी जीएसटी कार्यालय, भंडारा येथे सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी मनीष सहारे यांनी तक्रारदाराकडून ३५,००० रुपये लाचेची रक्कम स्वत: स्वीकारली, त्याचवेळी एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

आरोपीची घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, भंडारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर, पोलीस उपधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक उज्वला मडावी, नितेश देशमुख यांच्यासह एसीबी भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *