गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयातील प्रसिद्धीबाबत जिल्हाधिकाºयांनी संचालकांकडे समाधान व्यक्त केले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील विकास योजनांची प्रसिद्धी चांगली होत असल्याचे समाधान जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केले. नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौºयावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी श्री. नायर यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हाधिकारी श्री. नायर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी माहिती कार्यालयाकडून करीत असलेल्या सक्रिय प्रसिद्धी विषयक समाधान व्यक्त केले. माहिती संचालक डॉ. मुळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांचीही भेट घेतली.

माहिती कार्यालयाकडून मिळत असलेल्या सकारात्मक सहकार्याबद्दल श्री. बेहेरे यांनी माहिती संचालक डॉ. मुळे यांना सांगितले. या दौºया दरम्यान माहिती संचालक डॉ. मुळे यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रसिद्धी विषयक कामकाजाचा आढावा घेतला. कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर यांनी माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये, वरिष्ठ लिपिक धम्मदीप बोरकर, तुषार उरकांदे, संतोष राऊत उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *