
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : केंद्र सरकारच्या एन. आय. ए. (नॅशनल इंटीलेजन्स एजन्सी) मध्ये पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे सांगून एका वाहतूकदाराला लुटण्याचा प्रयत्न करणाºया एका तोतया अधिकाºयाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडे एमआयए विभागाचे बनावट ओळखपत्र आढळून आले. प्रल्हाद दिलीप कुमार सिन्हा (वय २५, रा. सातगांव, बुट्टीबोरी, जि. नागपूर) असे तोतया पोलिस अधिकाड्ढयाचे नाव आहे. फिर्यादी हसदीपसिंह परवींदरसिंह भाटिया (४३, रा. गुरुनानकपुरा, पाचपावली) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तसेच त्यांचा कामठी रोडवर दी पाल्म ग्रीन लॉन आणि फार्म हाऊस आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हसदीपसिंह हे वडिलासह फार्म हाऊसवर होते. त्यांना एका अनोळखी मोबाईलवर क्रमांकावरुन फोन केला. त्याने स्वत:ची ओळख बुट्टीबुरी येथे पोलिस निरीक्षक असल्याचे सांगितले. चोरी गेलेली दुचाकी तुमच्या फार्म हाऊससमोर उभी असल्याचे सांगितले. ती दुचाकी घेण्यासाठी आमचे पथक तेथे येणार आहे, असे दरडावले. काही मिनिटांतच अलिशान कारने एक युवक तेथे आला. त्याने स्वत:चे नाव प्रल्हाद दिलीपकुमार सिन्हा असे सांगून केंद्र सरकारच्या एन. आय. ए. (नॅशनल इंटीलेजन्सएजन्सी) मध्ये पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. हसदीपसिंह यांना ओळखपत्र दाखवले. त्यावर केंद्रीय तपास एजन्सी एनआयचा लोगो आणि अन्य माहिती होती. त्यांना थोडा संशय आल्याने त्यांनी लगेच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांना माहिती दिली. त्यांनी गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक गोल्हे यांच्या पथकाला शहानिशा करण्यासाठी पाठवले.