
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजमुद्रा ग्रुपतर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात करण्यात आली. शहरातील संताजी मंगल कार्यालय येथे सोमवारी आयोजित ‘चालता-फिरता दवाखाना’ अंतर्गत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात तब्बल ४१० नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. तपासणीदरम्यान १७० गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर ५५ रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठ- विण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाब, मधुमेह, नेत्रतपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. याच कार्यक्रमाअंतर्गत गडकिल्ले स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ल्यांची आकर्षक मॉडेल्स सादर करत त्यांच्या इतिहासाविषयी माहिती दिली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता व शिवकालीन वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले या स्पर्धेमध्ये गंगुबाई शाळा, माकडे शाळा, भारतीय कन्या शाळा, राष्ट्रीय शाळा, सेंट झोन मिशन शाळा, नेहरू शाळा, जनता शाळा, शारदा शाळा, या शाळेनी सहभाग नोंदवला होता ज्यात प्रथम पारितोषिक गंगुबाई गंगुबाई कारेमोरे शाळा यांनी पटकावला, द्वितीय पारितोषिक जनता विद्यालय तुमसर, तर तृतीय पारितोषिक सेंट जॉन मिशन हायस्कूल तुमसर यांनी पटकावला. हा मराठीत व सहभागी झालेल्या सर्व शाळांना काउन्सलिंग बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमास राजमुद्रा ग्रुपच्या मीरा भट, मीनल निमजे, पल्लवी निनावे, नेहा मोटघरे, पमा ठाकुर, पुनम पाठक, करुणा धुर्वे, जयश्री गभने, उर्मिला राजगिरे, शोभा शहारे, सागर भुरे, शुभम बाणासुरे, राहुल रणदिवे, स्वप्नील डुंबरे, बापू बडवाईक, सोमेश्वर लांजेवार, अर्पित खानोरकर, आयुष कुंजेकर, बालेश्वर लांजेवार, संदीप चौधरी, प्रदीप भरणेकर, हर्षल चौधरी तसेच ग्रुपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, पुढील काही दिवसांत आणखी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.