शासकीय पत्रावर वैद्यकीय अधिकाºयाची खोटी स्वाक्षरी..!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी:- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी /मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील कनिष्ठ सहाय्यकाने थेट वैद्यकीय अधिकाºयाचीच खोटी स्वाक्षरी करून शासकीय दस्तऐवजात अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरपुडे यांनी कनिष्ठ सहाय्यक भागवत मदनकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.खुलासा न मिळाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले परिचर राजू वलथरे यांच्या नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या काळातील घरभाडे भत्ता आणि अतिरिक्त घरभाडे भत्त्याच्या वसुलीबाबतची एक टिप्पणी प्रशासकीय स्तरावर प्रलंबित होती.

या कर्मचाºयाच्या घरभाडे कपातीबाबत मार्गदर्शन मागवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याच्या तोंडी सूचना वैद्यकीयअधिकाºयांनी कनिष्ठ सहाय्यकाला दिल्या होत्या. असे असतानाही, कनिष्ठ सहाय्यक भागवत मदनकर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतेही मार्गदर्शन मागवले नाही. उलट, ८ डिसेंबर २०२५ रोजीच्या आस्थापना विषयककामाशी संबंधित एका कार्यालयीन पत्रावर क्रमांक ३२५/२५ वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरपुडे यांची खोटी स्वाक्षरी केल्याचे उघडकीस आले. हा गंभीर प्रकार वैद्यकीय अधिकाºयांच्या निदर्शनास येताच आरोग्य केंद्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय शिस्तीचा भंग करणाºया आणि थेट अधिकाºयाच्या बनावट स्वाक्षरी करणाºया या प्रकारामुळे भंडारा जिल्हा परिषद आरोग्य विभागात कमालीची चर्चा सुरू झाली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *