भंडाºयात ‘शाळा वाचवा’ चा एल्गार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील १८ हजारांहून अधिक मराठी शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भंडाºयात संताप उसळला. आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन (अकरऋ) च्या नेतृत्वाखाली आज विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र एल्गार पुकारला. हुतात्मा स्मारक, शास्त्री चौक येथून निघालेला मोर्चा घोषणांनी दणाणून गेला. ‘आम्हाला दप्तर नाही शिक्षक पाहिजे’, ‘शिक्षण आमचा हक्क आहे’, ‘शाळा बंदीचा निर्णय रद्द करा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले. मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले ते शेकडो चिमुकले विद्यार्थी. आपल्या शाळा वाचल्या पाहिजेत या भावनेने अनेक बालके पालकांसह मोर्चात सहभागी झाली होती. काही विद्यार्थ्यांनी विविध महामानवांची वेशभूषा परिधान करून शासनाला जणू शिक्षणाच्या मूल्यांची आठवण करून दिली.

भंडारा जिल्ह्यातील तब्बल १५५ प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ‘शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करून शाळा बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला आहे,’ असा आरोप आंदोलकांनी केला. मोर्चाचे नेतृत्व अकरऋ चे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी केले. सभेत बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ‘ज्या गावांची लोकसंख्या कमी आहे, तिथे पटसंख्येचे निकष पूर्ण करायचे कुठून? शासन प्रवास भत्ता देण्याच्या गप्पा मारते; पण ज्या गावात रस्तेच नाहीत, तिथे बस कशी जाईल? जिथे इंटरनेट सुविधा नाही, तिथे नवीन शैक्षणिक धोरणाचे तथाकथित ‘मॉडेल’ कसे चालेल?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. चोपकर यांनी पुढे आरोप केला की, सरकारने १६५ कोटींची तरतूद करीत मोफत दप्तर देण्याचे निर्णय फक्त कमिशन खाण्यासाठीच घेतलेला आहे. दप्तर कोणी मागितलं आणि तर शिक्षक मागतोय. शासनशिक्षणाचे बाजारीकरण करून भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवत आहे. ‘शाळा बंद करून शिक्षणाचे खाजगीकरण केले जात आहे. उद्योगपती मित्रांसाठी स्वस्त मजूर तयार करण्याचा हा डाव आहे.

भारत तरुणांचा देश आहे; पण या तरुणांना शिक्षित नागरिक बनवण्याऐवजी कारखान्यांतील स्वस्त कामगार बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असा घणाघात त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड शिवकुमार गणवीर, संविधान बचाओ संघर्ष समितीचे रोशन जांभुळकर, चंद्रशेखर टेंभुर्णे, भाकतर्फे कॉम्रेड सदानंद इलमे, आजाद समाज पक्षातर्फे ज्ञानचंद्र जांभुळकर, ओबीसी तर्फे ललिता देशमुख, डॉक्टर बाळकृष्ण सार्वे, रमेश शहरे, रमेश बोरकर, चंद्रशेखर खोब्रागडे पालकांतर्फे महेंद्र मते भाग्यश्री लेनेकर अशोक नागपुरे सीमा डोंगरे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन सभेचे संचालन एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विश्वजीत बनकर यांनी केले तर समारोप व आभार माजी राज्य उपाध्यक्ष व भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले. यानंतर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. ‘शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा यावेळी देण्यात आला. भंडाºयातील हा एल्गार केवळ शाळा वाचविण्यासाठी नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी असल्याची भावना मोर्चातुन प्रकर्षाने व्यक्त झाली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *