मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद ,९ दुचाकी जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : परिसरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना अखेर लगाम बसला असून साकोली पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत ९ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. तसेच चोरीच्या तीन मोटरसायकली गोंदिया येथील कबाडीत विकल्याची कबुली आरोपींनी दिली असून संबंधित कबाड्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून साकोली, लाखांदूर व लाखनी पोलीसस्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटनांत वाढ होत होती. १७ फेब्रुवारी रोजी सानगडी येथे बोंडगाव देवी येथील आरोपी भिमसेन रामटेके (२४) व सचिन तरोणे (२०) हे दोघे दारूच्या नशेत चोरलेली मोटरसायकल विक्रीचा सौदा करत असल्याची गुप्त माहिती साकोलीचे ठाणेदार महादेव आचरेकर यांना मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत वडूले यांच्या पथकाने तत्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी अनेक मोटरसायकली चोरी करून विक्री केल्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीनुसार आरोपी कुंदन भैसारे (२२), रा. दाभना, मम्मदीप रामटेके (४०) रा. बाकटी, ता. मोरगावअजुर्नी, जि. गोंदिया यांच्यासह इतर विधी संघर्ष बालक साथीदारांची नावे समोर आली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून टोळीत आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *