
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बिलासपुर-गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर असलेले मंडारा रोड रेल्वे स्थानक रेल्वे थांब्यांबाबत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाकडून सतत दुर्लक्षित राहिले आहे. भंडारा जिल्हा असूनही अनेक सुपरफास्ट गाड्या येथे थांबत नाहीत. यामुळे भंडारा जिल्हा रेलयात्री सेवा समिती चे सचिव डॉ. बबन मेश्राम यांनी जिल्हाचे नेते खा. प्रफुल्लभाई पटेल यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा केली. दिनांक १९ फेब्रुवारी ला विश्राम भवन भंडारा येथे जनसामान्याचे समस्या जाणून घेण्यासाठी नियोजित वेळी उपस्थितीत होते.
यावेळी भंडारा जिल्हा रेल सेवा समितीचे सचिव डाँ. बबन मेश्राम, सुरेश फुलसुंगे, वारीयलदास खानवानी, बाबा बाच्छिल सह इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले. त्यात बिलासपुर झोनमध्ये येत असलेल्या व अमृत भारत योजनेतंर्गत निवडण्यात आलेल्या भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर अनेक सुपरफास्ट गाड्यांचा थांबा नाही. यामुळे रेल्वे प्रवासाना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात रेल यात्री सेवा समितीने रेल्वे मंत्री, दिल्ली रेल्वे बोर्डांचे विभागीय व्यवस्थापक नागपूर, रेल यात्री सेवा समितीच्या एका शिष्टमंडळाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना थांबा देण्याची विनंती केली. तरीही कारवाई न झाल्याबद्दल समिती व रेल यात्री नाराजी व्यक्त करीत असल्याचे चर्चात सांगितले. तसेच भंडारा रोड येथे अजमेर-पुरी ट्रेनचा थांबा द्यावे अशी प्रजापिता ब्रम्हकुमारीज इंश्वरीय विद्यापिठाची मागणी रेल समितीस केली. असल्याचे निवेदन खा. प्रफुलभाई पटेल यांना देण्यात आले. त्यामध्ये ट्रेन क्रमांक २०८२३ अजमेर- पुरी या ट्रेनचा भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यापीठ भंडाराचे व्यवस्थापक ब्रह्माकुमारी दिदि यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याना पाठविलेल्या निवेदनात केली असून आपण व्यक्तीश: दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली. प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यापीठ ही एक आध्यात्मीक संस्था आहे. संस्थचे मुख्यालय माउंट अबू येथे आहे.
१४० देशांमध्ये अनेक शाखा आहेत. भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर वरठी, भंडारा रोड, साकोली, पवनी, अड्याळ, आसगाव, लाखादूर, मोरगाव अर्जुनी, महापुर, जवाहरनगर, लाखनी, गडेगाव, कोढा कोसरा व जिल्ह्यात शाखा आहेत. अनेक बंधू आणि भगिनी माउंट अबूला भेट देतात. त्यांना सध्या माउद अबू येथे जाण्यासाठी ८० कि. मी. अंतरावर नागपूर येथे जावे लागते. त्यांच्या सोयीसाठी पुरी अजमेर ट्रेन क्रमांक २०८२३ चा भंडारा रोड रेल्वे स्थानकावर अप-डाउन थांबा देण्यात यावा अशी मागणी ब्रह्मा कुमारी शालू दीदी यांनी केली आहे. त्याबद्दल खा. पटेल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुढे रेल्वे च्या समस्या विषयी चर्चा करतांनी या स्थानकावरून ४० हाय-स्पीड गाड्या जातात. यापैकी काही आवश्यक गाड्यासाठी थांबा अपेक्षित आहेत. बिलासपूर हून निघणाºया सर्व गाड्या, जसे की बिलासपुर-पुणे आणि इतर गाड्या, भाटापारा, दुर्ग, भिलाई, राजनांदगाव, डोंगरगड, गोंदिया आणि इतर रेल्वे स्थानकावर थांबे देतात. परंतु या गाड्या भंडारा येथे थांबत नाहीत. भंडारा जिल्हा हा पितळ आणि तांदूळ उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी काही हाय-स्पीड गाड्यांना थांबा प्रदान करणे आवश्यक आहे. असे समितीचे सचिव प्रा. बबन मेश्राम यांनी सांगितले.