दरोड्यातील आरोपींना १२ तासांत अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील ग्राम कोरंभी परिसरातील वैनगंगा नदीपुलावर ट्रकचालकाला मारहाण करून १५ हजार रूपये लुटणाºया दहा ते बारा जणांच्या टोळीला अवघ्या १२ तासांत जेरबंद करण्यात भंडारा पोलीसांना यश आले आहे. दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी चे रात्री दिड वाजताच्या सुमारास ट्रक चालक नामे अकरमखान उसनखान पठाण वय ४५ रा. हासन वडेनर्सीपुरा कर्नाटक राज्य हे त्यांचे ट्रक के.ए-१८ सी-४८४५ मध्ये तांदुळ भरुन रायपुर इथुन नागपूरकडे जात असतांना भंडारा बायपास राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम कोरंभी जवळील वैनगंगा नदीचे पुलावर १० ते १२ इसमांनी हातामध्ये लाकडी दांडे घेऊन सदर ट्रक अडवुन ट्रक च्या काचा फोडुन ट्रकचे अदांजे ५० हजाराचे नुकसान केले . तसेच ट्रक चालकाला लाकडी दांडयाने मारहान करुन त्याच्या खिशातील १५ हजार रूपये जबरीने हिसकाविले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत अपराध क्र १७२३/२०२५ कलम ३१०(२),३११,१२६(२), ३२४ (४) भा. न्या. सं अन्वये दाखल करुन तपास सुरू करण्यात आला. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधिक्षक नूरुल हसन पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला नाकाबंदी लावण्याचे आदेश देत स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना सुध्दा आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान भंडारा पोलीसांनी तपासाचे चक्रे वेगाने फीरवुन पोलीसांचे खबरी व तांत्रीक पुराव्याचे आधारे साहिल चंद्रभोज रामटेके वय २२ वर्ष , मोहीत जयेश शेंन्डे वय २१ वर्ष ,आकाश मयुर बोरकर वय २० वर्ष रा. गणेशुपर, कुणाल राजु भोंगाडे वय २५ वर्ष सर्व रा. गणेशुपर, सचिन सुदाम साखरकर वय २० वर्ष , भावेश नरेंन्द्र धाबेकर वय १८ वर्ष दोन्ही रा. विद्यानगर , यश मोरेश्वर भागडकर वय १९ वर्ष रा. नविन नगर पारडी नागपुर, चिराग नमोद गजभिये वय २८ वर्ष , सागर देवानंद भुरे वय २६ वर्ष दोन्ही रा. रमाबाई आंबेडकर वार्ड भंडारा, श्याम भास्कर साठवणे वय २५ वर्ष रा. पिंडकेपार, रोशन श्रीकांत सिंदीमेश्राम वय २४ वर्ष रा. दहेगांव धानला जिल्हा नागपुर , निल उदाराम आंबिलढुके वय १८ वर्ष रा. दहेगांव जिल्हा-नागपुर ह.मु गणेशपुर यांना अवघ्या बारा तासांत आत ताब्यात घेऊन त्यांची सखोल विचारपुस केली असता आरोपींनी आपणच गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक आरोपींची २० डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *